Buldhana Congress News : बुलढाण्यात काँग्रेसमध्येच राडा, पक्षातली गटबाजी चव्हाट्यावर

बुलढाण्यात काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी समोर आली आहेत. बुलढाण्यात माजी आमदार दिलीपकुमार सानंद आणि काँग्रेस सेवादलाचे कार्यकर्ते तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्यात धक्काबुक्की झाली.

बुलढाण्यात काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी समोर आली आहेत. बुलढाण्यात माजी आमदार दिलीपकुमार सानंद आणि काँग्रेस सेवादलाचे कार्यकर्ते तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्यात धक्काबुक्की झाली. लोकसभेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रराचासाठी काल सभा पार पाडली. या सभेला उद्धव ठाकरे, मुकुल वासनिक हजर होते. उद्धव ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर दिलीपकुमार सानंद आणि तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्या शाब्दिक चकमक उडाली. आणि या वादाचे रुपांतर धक्काबुक्कीत झालं. या घटनेमुळे काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर आला आहे. काही कार्यकर्ते तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्या अंगावर धावून गेले. चव्हाण यांच्या गाडीची काचही काही जणांनी फोडली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com