RTO Rule : पार्किंग दाखवा, गाडी घ्या! नव्या नियमावलीसाठी RTO चा प्रस्ताव, पाहा Video

RTO Parking Rule : आरटीओने नवीन पार्किंग धोरणात काही सूचना करण्याचं ठरवलं आहे. त्यातच पार्किंगची जागा असल्याचं प्रमाणपत्र दाखवून गाडी खरेदी करा असा नियम लागू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

आपल्या मालकीची चारचाकी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण आता गाडी घ्यायची असेल तर स्वत:च्या मालकीची जागा असल्याचा पुरावा देण्याचा प्रस्तावच परिवहन विभागाकडून राज्य सरकारला पाठवण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे सामान्यांच्या चारचाकी घेण्याच्या स्वप्नावर रोड रोलर फिरण्याची शक्यता आहे. मुंबई आणि परिसरातील कमी होत चाललेल्या निवासी जागा आणि त्यांच्या वाढत्या किमती यामुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यावरच उपाय म्हणून आरटीओने नवीन पार्किंग धोरणात काही सूचना करण्याचं ठरवलं आहे. त्यातच गडी घेताना ती पार्किंग करण्याची व्यवस्था तुमच्याकडे आहे याचं प्रमाणपत्र सादर करण्याची अट टाकण्याचा विचार सुरू आहे.

दरम्यान, आरटीओच्या या पार्किंग प्रस्तावाला विरोध दर्शवला जात आहे. कारण शहरी भागांच्या इमारतीत पार्किंग व्यवस्था अपुरी आहे. हे प्रमाणपत्र मिळणं अनेकांना दुरापास्त होईल. पार्किंग प्रमाणपत्राच्या नियमाची अंमलबजावणी शहरी भागात कठीण होईल. अस्तित्वात असलेल्या गाड्यांच्या पार्किंगचा विचार करणे देखील महत्वाचे ठरणार आहे. मुंबईत आजही ४० वर्षांपेक्षा जुन्या सोसायटी आहेत, जिथे पार्किंगची सुविधाच नाही आहे. त्यामुळे आरटीओच्या या प्रस्तावाला विरोध केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com