Maharashtra Politics : भाजपचा अंतर्गत सर्व्हे रोहित पवारांनी फोडला ? पहा व्हिडिओ

Rohit Pawar On Vidhansabha Election : लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत होणार असल्याचे भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमधून समोर आले आहे. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात भिती पसरलीय असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा सुपडा साफ होणार असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेची माहितीच रोहित पवार यांनी समोर आणली आहे. यासंदर्भात यांनी एक ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महायुतीला केवळ १०० जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. अजित पवार यांच्या गटाला ७ ते ११ जागा, शिंदे सेनेला १७ ते २२ जागा आणि भाजपला ६२ ते ६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राजकीय गणितं बदलतील का? याची चर्चा आता सुरू झाली आहे. रोहित पवार यांनी कर्जत जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी होणार असल्याचेही आपल्या ट्विटमधून म्हंटले आहे.

रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये, ''भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार अजित पवार यांच्या गटाला ७ ते ११ जागा, शिंदे सेनेला १७ ते २२ जागा आणि भाजपला ६२ ते ६७ जागा मिळणार. लोकसभेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्यानं भाजपच्या अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू आहेत.'' असे म्हंटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com