Rohit Pawar : काहींची इच्छा नाही, पण.... सुनेत्राकाकींनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Rohit Pawar reaction after Sunetra Pawar becomes Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रोहित पवारांच्या सूचक प्रतिक्रियेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या चर्चांना वेग आला आहे.

Sunetra Pawar Deputy CM : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्याचवेळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावर आमदार रोहित पवारांनी सूचक प्रतिक्रिया देत राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत भाष्य केलं. सुनेत्राकाकींनी राष्ट्रीय अध्यक्षपदीही विराजमान व्हावं, काहींची इच्छा नसली तरी, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असं रोहित पवार म्हणाले. काहींची इच्छा नसली तरी, या वाक्यामुळं पवार यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात.. यावेळी सुनेत्राकाकींनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही विराजमान व्हावं, तसंच काहींची इच्छा नसली तरी लाखो कार्यकर्त्यांची हीच इच्छा आहे अशी पोस्ट रोहित पवारांनी एक्सवर केली.

रोहित पवार यांच्या ट्टीटमध्ये नेमकं काय? वाचा नेमकं

ज्या खुर्चीत बसून अजितदादा सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करायचे, त्याच खुर्चीत आज मा. सुनेत्राकाकींना पाहून मनात एकाच वेळी आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ उठलाय. या खुर्चीत आज अजितदादा नाहीत याचं अतीव दुःख आहे पण सुनेत्राकाकी आहेत याचा आनंदही आहे. अजितदादांची उणीव कदापि भरुन काढता येणार नाही पण सुनेत्राकाकी या अजितदादांच्या शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराने काम करताना राज्यभरातील सामान्य माणूस आणि त्याचा विकास हेच ध्येय ठेवून काम करतील, याचा पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा! तसंच उपमुख्यमंत्री पदासह त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही लवकरच विराजमान व्हावं, ही काही नेत्यांची इच्छा नसली तरी राज्यभरातील लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, त्यामुळं तीही त्या पूर्ण करतील, असा विश्वास आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com