Maratha Reservation: सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद, मराठा आरक्षणावरून भुजबळ नाराज, विखे पाटील म्हणाले आम्ही कोणाचे आरक्षण काढून घेत नाही|VIDEO

Chhagan Bhujbal Upset With Maratha Reservation Ordinance: मराठा आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पलटवार करत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचे स्पष्ट केले.
Summary

मराठा आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद उफाळले.

छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण धोक्यात असल्याची भूमिका मांडली.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुजबळ यांना प्रत्युत्तर दिले.

सरकारने मराठा समाजाच्या 6 मागण्या मान्य करून अध्यादेश काढला.

मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटीयरनुसार कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचा आणि सातारा गॅझेटीयरच अभ्यास करून एक महिन्यात त्यावर निर्णय घेणार असल्याचा मंगळवारी सरकारने अध्यादेश काढल्यानंतर मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाज हा आरक्षणासाठी लढा देत होता. काल फडणवीस सरकारने 9 पैकी 6 मागण्या मान्य केल्या.

यानंतर मनोज जरांगे यांनी देखील उपोषण सोडत सरकारचे आभार मानले. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी यावर नाराजी व्यक्त करत ओबीसी आरक्षणाला धक्का बसल्याचे सांगत यावर नाराजी व्यक्त केली. यावर मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेपाटील यांनी पलटवार करत भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. भुजबळ यांना काहीतरी गैरसमज झाला आहे. कुठेही ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाहीये. त्यामुळे विनाकारण गैरसमज करू नये जे वास्तव आहे त्या स्वीकारले पाहिजे,आम्ही काय कोणाचे आरक्षण काढून घेत नाही.किंबहुणा गरीब आणि वंचित मराठा समाजाला न्याय देण्याचीच सरकारची भूमिका आहे असे विखे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com