Beating the retreat from the Attari - Wagah Border : आज देशभरात ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान अटारी-वाघा बॉर्डरवरही प्रजासत्ताक दिनी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यंदाही मोठ्या प्रमाणात अनेक राज्यांमधील नागरिक 'बिटिंग द रिट्रीट' पाहण्यासाठी अटारी-वाघा बॉर्डरवर जमले होते. बिटिंग द रिट्रीट सोहळ्यात भारतीय जवानांनी आपले शौर्य दाखवले. जमलेल्या सर्वांनी 'भारत माता की जय', 'जय हिंद' अशा घोषणा देत जवानांचा उत्साह वाढवला. या कार्यक्रमात भारताकडून बीएसएफचे जवान आणि पाकिस्तानकडून पाकिस्तानी रेंजर्स आमनेसामने असतात. या सोहळ्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.