VIDEO: पुण्यात पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती, अल्पवयीन मुलाकडून अवजड टॅंकरचा अपघात

Pune Accident News: अल्पवयीन मुलाकडून अवजड टॅंकरचा अपघात, दोन मुली आणि दुचाकीस्वाराला धडक.

पुण्याच्या वानवडीत अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुणे पोर्शे प्रकरण ताजं असतानाच पुण्यातून आणखी एक अपघाताची बातमी समोर येत आहे. हा अपघात सकाळी साडे सहाच्या सुमारास घडला असून दोन मुली आणि दुचाकीस्वाराला धडक दिली आहे. अपघातात मुली आणि महिला जखमी झाल्या आहेत. अपघाताला कारणीभूत ठरलेला टँकर हा 14 वर्षांचा मुलगा चालवत होता अशी माहिती समोर येत आहे. नागरिकांनी हा टँकर अडवून धरला असून चालकाला पकडून ठेवले आहे. अवजड टँकर अवघ्या 14 वर्षाच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने पुण्याच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com