VIDEO: थेट मोटरमॅनच्या कॅबीनमध्ये घुसत बनवली Reel, पुढे काय झालं पाहा....

Kasara Railway Station Viral Reel News: कसारा रेल्वे स्थानकावर मोटरमनच्या केबिनमध्ये घुसून बनवली Reel, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी केली अटक.

मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकात मोटरमन केबिनमध्ये घुसून Reel केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रील करणाऱ्या दोन तरूणांना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक केली आहे. राजा हिम्मत येरवाल (२०), रितेश हिरालाल जाधव (१८) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे दोघेही नाशिक येथील रहिवासी आहेत. गेल्या दहा काही दिवसांपूर्वी कसारा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक चारवर उभ्या असलेल्या लोकलच्या मोटरमॅन कॅबिनमध्ये बेकायदा घुसून आरोपींनी रील तयार केली होती. यात ते स्वतः मोटरमॅन असल्यासारखे तेथील यंत्रणेची हाताळणी करत होते. रील त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली होती. रेल्वे स्थानकांमधील सीसीटीव्ही तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी या दोन्ही तरूणांची ओळख पटली. रेल्वे सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांनी नाशिकमध्ये या तरूणांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली. या दोन्ही तरुणांना नाशिक येथून अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com