Breaking News

Mira Bhayandar School Bomb Threat : मिरा भाईंदरमधील शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी|VIDEO

Mira Bhayandar School Bomb Threat : शाळेला बॉम्बने उडवून देणार असल्याचा धमकीमुळे शाळा प्रशासन, पोलिस आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. १६ जूनसाठी सुरक्षेच्या दृष्टीने शाळेला अलर्ट करण्यात आलं आहे.
video

मिरा भाईंदर परिसरातील आर.बी.के. शाळेला १४ जून रोजी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मेलद्वारे मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेच्या अधिकाऱ्यांना एका अज्ञात मेल आयडी — divijprabhakaralakshmi — वरून ही धमकी आली होती. मेलमध्ये १६ जून रोजी शाळेला बॉम्बने उडवून देणार असल्याचा इशारा दिला गेला आहे .

याची माहिती मिळताच शाळेच्या प्रशासनाने तात्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला.शाळेने तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर बॉम्ब शोधक पथक, स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. १६ जून रोजी बॉम्बस्फोटाची धमकी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने शाळेला अलर्ट करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com