VIDEO: जिल्ह्यात 6 विधानसभेत स्वतंत्र उमेदवार उभे करणार, Ravikant Tupkar यांचा मोठा निर्णय

Ravikant Tupkar News: रविकांत तुपकर यांचा विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी रविकांत तुपकर यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. तुपकर यांनी आज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत रविकांत तुपकर यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, खामगाव, जळगांव जामोद , मेहकर मध्ये लढणार असल्याचं ते म्हणाले. आजपासून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे तूपकरांचे आदेश दिले आहेत. 13 किंवा 14 जुलै ला पुणे येथे तुपकर राज्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. जिल्ह्यात 6 विधानसभेत स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्यााचा मोठा निर्णय तुपकर यांनी घेतला आहे. याशिवाय राज्यातील , जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकात सुद्धा उमेदवार उभे करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com