VIDEO : Ravi Rana यांची Vijay Wadettiwar यांच्यावर टीका करताना जीभ घसरली

Ravi Rana On Vijay Wadettiwar News : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याविषयी बोलताना आमदार रवी राणा यांची जीभ पुन्हा घसरली आहे, तसेच 'लाडकी बहीण'च्या केलेल्या वक्तव्यावरून राणा यांनी युटर्न घेतल्याचं पाहायला मिळालं

बहिणींनी आशीर्वाद दिला नाही तर 1500 रू खात्यातून परत घेणार, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं होतं, राणांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. विरोधकांकडूनही त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.

त्यानंतर रवी राणा यांनी आपल्या भाषणातून केलेल्या वक्तव्यावरून युटर्न घेत, 'बहिण भावाच्या नात्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात मी गमतीने बोललो असं म्हणत राणांनी आपल्या विधानाची सारवासारव केली आहे. 'तसेच भाऊ बहीणीचे पैसे घेत नसतो तर देत असतो' असं वक्तव्य देखील त्यांनी केल.याच दरम्यान बोलताना रवी राणा यांची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे. थेट नाव घेत रवी राणा यांनी वडेट्टीवारांवर खालच्या भाषेत टीका केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com