Ratan Tata Passed Away : उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलं रतन टाटांच अंत्यदर्शन

Deputy CM Ajit Pawar Tribute To Ratan Tata : टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनसीपीएच्या लॉनमध्ये ठेवण्यात आलं आहे. यावेळी अनेक दिग्गज नेते येथे भेट देत आहेत.

टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या सभागृहात ठेवण्यात आले आहे. येथे लोकांना त्यांचे शेवटचे दर्शन घेता येणार आहे. त्यांच्या दर्शनासाठी सध्या अनेक दिग्गज नेते, उद्योजक येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील रतन टाटा यांच्या अंतिमदर्शनासाठी हजेरी लावली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांनी देखील याठिकाणी अंत्यदर्शन घेतलं आहे.

मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) रतन टाटा यांना दाखल करण्यात आले होते. त्यांना वयोमानानुसार त्रास होत होता. रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी तिरंग्यात गुंडाळलेले रतन टाटा यांचे पार्थिव नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) च्या लॉनमध्ये ठेवण्यात आले आहे. येथे लोकांना सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत त्यांचे शेवटचे अत्यंदर्शन घेता येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com