VIDEO : जुन्नरचे पदाधिकारी पवारांच्या भेटीला; बघा काय केली मागणी

Sharad Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे जुन्नर येथील पदाधिकारी थेट पुण्यात शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.

शरद पवार यांच्या भेटीसाठी जुन्नरचे कार्यकर्ते पदाधिकारी पुण्यात एकवटले आहेत. आपल्या मागण्या थेट पवार साहेबांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. यावेळी भेटीनंतर पदाधिकाऱ्यांनी फोटोसाठी आग्रह केल्यावर शरद पवार यांनी त्यांच्यासोबत फोटो देखील काढले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. जागावाटपाच्या विषयावर बैठका सुरू असतानाच रविवारी जुन्नर येथील पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेटण्याचा आग्रह धरला. यासाठी हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जुन्नरहून थेट पुणे गाठले आहे. यावेळी आपल्या मागण्या त्यांनी शरद पवार यांच्यापुढे मांडल्या. तसेच जुन्नरचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे पवार साहेबांच्या सोबतच आहेत असा विश्वास देखील त्यांनी यावेली शरद पवार यांना दिला आहे. यावेली कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यासोबत फोटो काढण्याचा आग्रह धरला, त्यांना शरद पवार यांनी फोटोही दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com