Raosaheb Danve: मविआकडून भाजपात फोडाफोडी? दानवेंचा गंभीर आरोप!

Chhatrapati Sambhajinagar News: राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मविआकडून भाजप पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय असा गंभीर आरोप रावसाहेब दानवेंनी केला आहे.

संभाजीनगर: छ.संभाजीनगरमधील अनेक नगरसेवक आणि राजू शिंदे (Raju Shinde ) हे ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. त्यांच्या काही दिवसांत मातोश्रीवर पक्षप्रवेश देखील पार पडणार आहे.दरम्यान भाजपच्या नेत्यांना फोडण्याचं काम मविआकडून सुरु आहे. असा गंभीर आरोप रावसाहेब दानवेंकडून मविआवर (MVA) केलाय. दरम्यान रावसाहेब दानवेंनी मविआवर केलेल्या आरोपाला अंबादास दानवेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय.म्हणाले, शिवसेना बिलकुल फोडाफोडीचं राजकारण करत नाही,परंतु कोणाला शिवसेनेत यायचं असेल तर त्यांनी आम्ही थांबवू शकत नाही.राजू शिंदे यांच्या मनधरणीसाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com