Ramdas Kadam Wife: गरीबीचे दिवस, स्टोव्हवर स्वयंपाक, पदर जळाला; रामदास कदम यांच्या पत्नीने सांगितला तो थरारक प्रसंग|VIDEO

Jyoti Kadam 1993 Fire Accident Real Story: रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी 1993 साली घडलेल्या अपघाताविषयी सत्य स्पष्ट केले आहे. अनिल परब यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे त्या म्हणाल्या.

दोन्ही शिवसेनेच्या गटांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी काल 1993 साली रामदास कदम यांची पत्नी ज्योती कदम यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा मुलगा योगेश कदम राज्याचा गृहमंत्री आहे. त्यामुळे त्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. कदम यांच्या घरात 1993 साली काय झाले होते, हे माहीत करून घेण्यासाठी कदम यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी परब यांनी केली होती. या सगळ्या आरोपाबाबत आज थेट पत्रकार परिषदेत रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

ज्योती कदम म्हणाल्या की, काल जे आरोप केले ते खोटे आहेत. काल त्यांनी जे आरोप केले ते फार चुकीचे आहेत, तेव्हा आम्ही इतके श्रीमंत नव्हतो की, आमच्याकडे गॅस सिलेंडर असावा, मी स्टोव्हवरती स्वयंपाक करत होते, मी करवंत्या जाळून स्वयंपाक करत होते. त्यावेळी माझा पदर जळाला, त्यानंतर ही घटना घडली होती. मला वाचवताना त्यांचे हात देखील भाजले होते, हे फार चुकीचे आहेत.त्यानंतर त्यांनी मला जसलोक रुग्णालयात नेले नंतर बाहेर देशात ट्रीटमेंटला नेले होते. हे फार चुकीचे आरोप करत आहे. मी पहिल्यांदा मिडियासमोर आले असेही त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com