Ramda Athawale on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे तुमचे नखरे, रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी

Ramda Athawale on Uddhav Thackeray | आठवलेंची कवितेतून जोरदार फटकेबाजी

छत्रपती शिवाजी महाराज पार्कात महायुतीची सभा झाली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कवितेतून विरोधकांवर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी आहेत या देशावर तुफान आणि राहुल गांधी करतात देशाचे राजकारण घाण. कुणाचा बाप जरी आला तरी बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलू शकत नाही असे आठवले म्हणाले. तसेच या ठिकाणी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे. पण इंडिया आघाडीत तुम्हाला कोण पंतप्रधान बनवणार? जो पर्यंत नरेंद्र मोदी आहेत तोपर्यंत तुम्हाला पंतप्रधान कोण बनवणार असेही आठवले म्हणाले. उद्धव ठाकरे तुमचे नखरे, आमच्यासोबत आहेत राज ठाकरे अशी कविताही आठवलेंनी म्हटली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com