Ramdas Athawale News: आठवले तिसऱ्यांदा होणार केंद्रीय मंत्री, आज शपथविधी

आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आठवले तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली.

रामदास आठवले तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत जागावाटपात आठवलेंना एकही जागा मिळाली नव्हती. तरी देशभरात आठवलेंनी भाजपचा प्रचार केला होता. आता रामदास आठवलेंची वर्णी पुन्हा केंद्रीय मंत्रपदी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत आठवले यांनी शिर्डी लोकसभेतून तिकिट मागितलं होतं. पण भाजपने ही जागा देण्यास नकार दिला. त्यानंतरही आठवले यांनी भाजपसाठी प्रचार केला. आता आगामी विधानसभा निवडणुकीत आठवलेंसाठी काही जागा सोडल्या जातील असे सांगितले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com