2011 च्या शेतकरी आंदोलनाच्या न्यायालयीन संदर्भातील प्रकरणासाठी आज इंदापूर न्यायालयात माजी खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. वकिलांच्या बार रूममध्ये दोघे एका सोफ्यावर एकत्र बसले असले तरी त्यांनी एकमेकांकडे नजरही टाकली नाही. यानंतर पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी यांनी थेट सदाभाऊंवर निशाणा साधला. तुम्ही दोघे एका केस संदर्भात कोर्टात एकत्र आला आहात भविष्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती एकत्र दिसणार का असा प्रश्न पत्रकारांनी शेट्टी यांना विचारले असता शेट्टी आणि थेट सदाभाऊ खोत यांना टोला लगावला शेट्टी म्हणाले “सरकारच्या विरोधात लढण्याची हिंमत त्यांच्यात असेल असे मला वाटत नाही,” असा थेट टोला शेट्टींनी लगावला. शेतकरी संघटनेतील मतभेदांमुळे आधीच तणावग्रस्त असलेले हे दोन्ही नेते, आजच्या प्रसंगामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राजकीय वर्तुळात यानंतरच्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.