Parali News : परळीत धनंजय मुंडेंसमोरील आव्हान वाढणार ?

Maharashtra Politics : राजाभाऊ फड हे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे परळीत राजाभाऊ फड हे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

राजाभाऊ फड हे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. थोड्यावेळातच शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. राजाभाऊ तुतारी हाती घेणार असल्याने परळीत धनंजय मुंडे यांच्यासमोर आवाहन उभं राहणार आहे.

राज्यात विधानसभेचे वारे वाहायला लागले आहेत. अशातच परळीत चुरशीची लढत होण्याचे चिन्ह दिसत आहेत. राजाभाऊ फड ही शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याने आता विधानसभेला धनंजय मुंडे यांचा रस्ता खडतर असण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत. परळीचे राजाभाऊ फड हे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई आहेत. ते रासपाचे युवा प्रदेशाध्यक्ष देखील राहिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत परळी मंतदारसंघातून फड निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. शरद पवार गटात प्रवेश करून आता फड तुतारी हातात घेणार आहेत. त्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे विरुद्ध राजाभाऊ फड असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com