VIDEO : राज ठाकरे आपल्याच कार्यकर्त्यांवर संतापले; पाहा काय आहे कारण

Raj Thackrey : छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांवर भडकलेले बघायला मिळाले. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान आपल्याच कार्यकर्त्यांवर भडकले आहेत. यासंदर्भातील एक व्हिडिओ समोर आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांपूर्वी ते संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी कार्यकर्ते परवानगी न घेता हॉटेलवर भेटायला आल्याने राज ठाकरे संतापलेले दिसले आहेत. बैठकीच्या ठिकाणी थांबायला सांगितलं होतं मग इकडे का आलात असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केला आहे. या सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मी बैठकीच्या ठिकाणी थांबायला सांगितलं होत, तिथेही मी भेटलोच असतो. मग परवानगी न घेता इथे कशाला आलात? अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपल्याच कार्यकर्त्यांवर संताप व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com