VIDEO: मुंबईला पावसाने झोडपलं, दरड कोसळून घरांचं नुकसान

Mumbai Rain News: पावसादरम्यान अनेक ठिकाणी दुर्घटनांचं सत्र, मुंबईमधील घाटकोपरमध्ये कोसळली दरड.

सकाळपासूनच मुंबई तसेच मुंबई उपनगरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसादरम्यान अनेक ठिकाणी दुर्घटना होत असल्याच्या बातम्या येत असतात. अशातच आता मुंबईमधील घाटकोपर येथे दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. घाटकोपरमधील भटवाडी कातोडी पाडा येथे दरड कोसळली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. दरड कोसळलेल्या ठिकाणी दोन घरं होती अशी माहिती समोर येत आहे. त्या घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सुदैवाने घरात कोणी नसल्याकारणाने जीवितहानी झालेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com