Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा भाजपकडून प्रयत्न, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा आरोप

Congress Program In Pune: पुण्यात आज राहुल गांधी यांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी ते आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावरून राजकारण तापले.

पुण्यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा'छात्रों की गुंज' हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाद्वारे राहुल गांधी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहे. या कार्यक्रमामध्ये ते २५ हजार विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी पुण्यात सर्वच ठिकाणी बॅनर्स झळकले आहे. पण या कार्यक्रमाला भाजपने विरोध केला आहे. या कार्यक्रमापूर्वी पुण्यात ५० ते ६० काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे नेते देखील पुण्यात दाखल झाले आहेत. या कार्यक्रमासाठी आलेल्या काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, 'काल जी घटना झाली ती भाजपच्या गुंडगिरीचा प्रकार होता. ते राहुल गांधींना घाबरवण्यासाठी आणि राहुल गांधींचा कार्यक्रम होऊ नये यासाठी षडयंत्र रचत आहेत. युवक काँग्रेसला घाबरवण्यासाठी आणि या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आम्हाला अडचणी याव्यात म्हणून मुलींना भीतीपोटी डांबून ठेवलं होतं. महाविद्यालयाबाहेर छेडछाडीचा प्रकार घडला. आमच्या कार्यकर्त्यांना ते कळलं आणि आमचे कार्यकर्ते तिथे पोहोचले. ABVP च्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही केली होती. पोलिसांनी मुला- मुलींना धक्काबुक्की केली. अनेक जण जखमी झाले आहेत. गेटवर भाजपचे काही गुंड आले होते आणि उद्रेक होईल अशी परिस्थिती निर्माण केली .'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com