Rahul Gandhi Kolhapur Visit : राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, काय आहे कारण?

Rahul Gandhi on Kolhapur Visit : राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्यांनी त्यामागचं कारण स्पष्ट केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा महत्वाचा मानला जात असताना, विमानातील बिघाडामुळं त्यांचा आजचा दौरा रद्द करण्यात आला आहे. राहुल गांधी हे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. आजपासून या दौऱ्याला सुरुवात होणार होती. तब्बल १४ वर्षांनी ते कोल्हापुरात येणार होते. याशिवाय कोल्हापुरातूनच विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा रणशिंग फुंकणार होते. मात्र, विमानात बिघाड झाला आणि त्यांचा आजचा दौरा रद्द करण्यात आला आहे. या दौऱ्यात आता बदल करण्यात आला आहे. उद्या शनिवारी सकाळी राहुल गांधी कोल्हापुरात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे कोल्हापुरात येण्यासाठी रवाना झाले होते. पण विमानात झालेल्या बिघाडामुळे ते येऊ शकणार नाहीत. त्यांचे आजचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ते उद्या कोल्हापुरात येतील, अशी माहिती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com