Video: Anurag Thakur यांची राहुल गांधींवर जातीवाचक टीका? बघा नेमकं काय म्हणाले?

Anurag Thakur On Rahul Gandhi News: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभेत विरोधीपक्षनेते राहुल गांधी आणि अनुराग ठाकूर यांच्यात जनगणनेवरुन जुंपलीये.

राहुल गांधी हे अनेक वेळा जनगणनेच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले होते. यावरुन आता लोकसभेत देखील जनगणनेवरुन राहुल गांधी आणि अनुराग ठाकूर यांच्यात जुंपली.लोकसभेमध्ये अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर जातीवाचक टीका केलीये, ज्यांच्या जातीचं माहित नाही ते जनगणनेचं बोलतात असं अनुराग ठाकूर लोकसभेत म्हणाले. जनगणनेच्या मुद्द्यावरुन लोकसभेत अनुराग ठाकूर आणि राहुल गांधी यांच्या जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. राहुल गांधींनी देखील अनुराग ठाकूर यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. म्हणाले, जेवढा माझा अपमान करायचा आहे तेवढा करा,परंतु आम्ही जातीय जनगणना पास करुन दाखवणारच.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com