Video: पूजा खेडकर प्रकरणानंतर पुणे झेडपी अलर्ट मोडवर
Pooja Khedkar: पुजा खेडकर प्रकरणानंतर पुणे जिल्हा परिषद अलर्ट मोडवर आली असून दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेणाऱ्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची तपासणी सुरु केलीय. जिल्हा परिषद शिक्षक, पदवीधर शिक्षक, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी वैद्यकीय प्रमाणपत्र तपासणी लावलीय. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील शिक्षकांनी बदली, व्यवसाय कर सुट, वाहन भत्ता, आयकर सुट आणि इतर सवलती मिळविण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवली असून याबाबत आता तपासणी केली जाणार आहे याबाबत शिक्षण विभागाने गट शिक्षण अधिकारी यांना पत्र लिहून माहिती मागवलीय. जिल्ह्यातील 350 अधिक शिक्षकांनी शासकीय सुविधांचा लाभ मिळविण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेतल्याची प्राथमिक माहिती असून आता पुन्हा तपासणी होणार असल्याने दिव्यांग लाभार्थी शिक्षकांना दणका बसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.