Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील २ ऑगस्टला पुणे कोर्टात होणार हजर
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील २ ऑगस्टला पुणे कोर्टात उपस्थितीत राहणार आहेत. जरांगे पाटील यांच्या वकिलांनी याबाबत अर्ज दाखल केला आहे. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या दोन साथीदारांविरोधात नाट्यनिर्मात्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याप्रकरणाच्या सुनावणीला हजर न राहिल्यामुळे पुणे कोर्टाने मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या २ साथीदारांविरोधात अटक वारंट काढले होते. त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये अर्ज केला. मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे दोन्ही साथीदार कोर्टात हजर राहतील असे जरांगेच्या वकिलांनी अर्जाद्वारे सांगितले. वॉरंट इशू करू नये म्हणून २ ऑगस्टला कोर्टात हजर होऊ असं मनोज जरांगे यांच्या वकीलांकडून सांगण्यात आले आहे. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे आणि इतर दोन जणांच्या विरोधात काल पुणे कोर्टाने अटक वॉरंट जारी केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.