VIDEO: पालकांनो सावधान! पुण्यातील ५० शाळा अनधिकृत, विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

Pune Unauthorized Schools: पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये ५० शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. या शाळांची यादी जिल्हा परिषदेने जाहीर केली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांसाठी शाळेत प्रवेश घेताना सावधानता बाळगावी असे आवाहन केले जात आहे.

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील ५० शाळा अनधिकृत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहेत. पुणे शहरातील १४, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २५ आणि पिंपरी चिंचवडमधील ११ शाळांचा यामध्ये समावेश आहे. शहर आणि जिल्ह्यातील अनधिकृत शाळांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने मोहिम राबवली आहे. या अनधिकृत शाळांमुळे यापुढे पालकांनी आपल्या मुलांसाठी शाळा निवडताना काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे. पुण्यातील ५० अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेताना पालकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन केले जात आहे. अशा अनधिकृत शाळांमध्ये मुलांना पाठवून नका, असे देखील आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com