मुसळधार पावसानं पुण्यात दाणादाण, वाहनं अडकली, ट्रॅफिकला ब्रेक; थरकाप उडवणारी दृश्ये, VIDEO

Heavy Rain Pune Traffic chaos flooded roads : पुण्यात आज, गुरुवारी संध्याकाळी पावसानं धुमाकूळ घातला. अनेक महत्वाचे रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळं वाहतुकीला ब्रेक लागला.

पुण्याला आज संध्याकाळपासून पावसानं झोडपून काढलं. तासभर झालेल्या पावसामुळं पुणेकरांची दाणादाण उडवली. शहरातील चांदणी चौक ते कोथरूड रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी होतं. पावसाच्या साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना कसरत करावी लागली.

चांदणी चौक ते कोथरूड रस्त्याच्या उतारावरील परिस्थिती भयंकर झाली होती. कोथरूड, भुसारी कॉलनी आदी भागातही पाणी साचलं होतं. पुण्यातील बाणेर-औंध रस्त्यावरील वाहतूक तर पावसाचं पाणी साचल्यानं तासाभरानंतरही संथ सुरू होती. बाणेर परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यातून वाट काढताना वाहनचालकांचे अतोनात हाल झाले. दोन तासांपासून बाणेरकडून औंध, विद्यापीठ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. पाण्यातून काही वाहनं बाहेर येऊ न शकल्यानं ती रस्त्यातच बंद पडली. बाणेर ते विद्यापीठ रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

दुसरीकडे, आंबेगाव कात्रज परिसरात जोरदार पाऊस पडला. त्यामुळं रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. अनेक ठिकाणी पाणी भरलं. अनेकांची वाहने या पाण्यात अडकल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com