Congress Assembly Election News : काँग्रसेचा पुण्यातील पाच जागांवर दावा, प्रदेशाध्यक्ष पटोलेंकडे प्रस्ताव

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी केली आहे. पुण्यातील पाच जागांवर काँग्रेसने दावा केला आहे.

पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) काँग्रेसला (Congress) यश मिळाल्यानंतर पक्षाने विधानसभेची तयारी सुरू केली आहे. काँग्रसने पुण्यातील (Pune) पाच मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. याचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. काँग्रेसच्या पुण्यातील आठ नेत्यांनी विधानसभेसाठी अर्ज नेला आहे. कसबा, पुणे कॅन्टोनमेंट, शिवाजीनगर, हडपसर, पर्वती या मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. लोकसभेत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्याने राज्यात काँग्रेस विधानसभेत स्वबळावर लढेल असं सांगितलं जात होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com