Pune News : पुण्यातून मोठी बातमी, जैन बोर्डिंगचा जागेचा व्यवहार बिल्डरने केला रद्द

Jain Boarding Trust Case : पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखलेंनी नैतिकतेच्या कारणावरून रद्द केला आहे. दरम्यान, जैन मुनींच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

Vishal Gokhale cancels Jain trust land deal in Pune : पुण्यातील जैन बोर्डींग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय बिल्डर विशाल गोखलेंनी घेतला आहे. जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय गोखलेंनी ई-मेलद्वारे ट्र्स्टला कळवल्याचे समोर आले आहे.नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं गोखलेंनी म्हटलंय. याशिवाय ⁠जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या, असंही गोखलेंनी म्हटलंय.

जैन मुनींना उपोषणासाठी परवानगी नाकारली?

जैन मंदिर आणि कबुतरखान्यांच्या रक्षणासाठी, गाईंच्या, गोरक्षणाच्या रक्षणासाठी जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी येत्या 1 नोव्हेंबरला आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र त्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. सुट्टीचा दिवस आणि मनसेचा नियोजित मोर्चा या पार्श्वभूमीवर ही परवानगी नाकारण्यात आल्याचं समजतं. जैन मुनींचं हे आंदोलन आता 3 नोव्हेंबरला होणारेय. मुनी निलेश चंद्र विजय यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. मात्र 3 नोव्हेंबरला सोमवार असल्यामुळे जैन समाजाकडून प्रतिसाद मिळणार का यासंदर्भात शंका उपस्थित केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com