Buldhana Protest News: बुलढाण्यामध्ये सरकार विरोधात आंदोलन!

सिंदखेड राजा ते शेगांव भक्तिमार्ग रद्द करा! सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकाळपासून शेतकरी उतरले रस्त्यावर...

Buldhana Protest: बुलढाण्यामध्ये सरकार विरोधात एक आंदोलन सुरु आहे. इथल्या शेतकरी कृती समितीकडून सरकार विरोधात थाळीनाद आंदोलन करण्यात येतंय. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते शेगाव हा 109 किमी चा रस्ता भक्तिमार्ग तयार होत असून या भक्तिमार्गलाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केलाय. हा मार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून बाधित शेतकरी रस्त्यावर उतरून सकाळपासून थाळीनाद आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांची शेती या मार्गात जात असल्याने शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे शेतकरी या मार्गाला विरोध करत आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी ..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com