VIDEO: तिसऱ्या आघाडीचा प्रस्ताव? Imtiyaz Jaleel काय म्हणाले?

Imtiyaz Jaleel on Vishalgad News: तिसऱ्या आघाडीच्या चर्चेबाबत एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया, विशाळगडावरील घटना हिंसक.

माध्यमांमध्ये तिसरी आघाडी निर्माण होण्याच्या चर्चा सुरु आहे यावर एमआयएमचे नेते इम्तियाज जलिल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिसऱ्या आघाडीच्या चर्चेबाबत आम्हाला काहीही माहित नाही, आम्हाला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही असं जलिल म्हणाले. मात्र असा कुठलाही प्रस्ताव आला तर त्याचं स्वागत असेल असं देखील झलिल यांनी सांगितलं आहे. यातून मुस्लिम समाजाला काय मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असल्याचं इम्तियाज जलिल म्हणाले. विधानपरिषदेत एकही मुस्लीम आमदार नाही, तुम्हाला पक्त मतदान पाहिजे परंतु त्याचं नेतृत्व नाही पाहीजे अशी टीका देखील जलील यांनी केली आहे. विधानसभेमध्ये Alliance नाही झाली तरी आमची निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं जलील यांनी म्हटलं आहे. विशाळगडावर मुस्लिम समाजाच्या घरात घुसून जाळपोळ केली तेव्हा पोलीस बघ्याच्या भुमीकेत होते, विशाळगडावर झालेल्या हिंसक घटनेचं उत्तर उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं पाहिजे असं देखील इम्तियाज जलील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com