Hair Cutting News: महागाईच्या झळा आणखी तीव्र; केस कापणं अन् दाढी करणं महागणार; 20 टक्के दरवाढीचा निर्णय

Price Hike of Hair Cutting: येत्या १ जानेवारीपासून मगाईच्या झळा आणखी तीव्र होणार असून त्यात केस कापणं,दाढी करणं सुद्धा महागणार आहे.

गेल्या काही वर्षात प्रत्येक वस्तुंच्या किंमतीत भलीमोठी वाढ झाली आहे. त्यातच आता येत्या नवीन वर्षात महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार असल्याचे दिसून येत आहे. येत्या १ जानेवारीपासून केस कापणं, दाढी करणं महाग होणार आहे. ही वाढ फक्त ग्रामीण भागात नाही तर शहरात सुद्धा करण्यात येणार आहे मात्र २० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

तुम्ही पाहिले असे गेल्या काही महिन्यात नाही तर वर्षात महागाईने सर्व सामान्य नागरिकांना टेंशन दिलेले आहे. कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने त्याचा फटका इंधन दरातही झाला आहे. अशा पद्दतीने दररोज वाढत असलेल्या महागाईमुळे दरवाढ करण्याची मागणीही सलून व्यावसायिकांकडून करण्यात आली होती.

सलून असोशिएशनचे मुंबई अध्यक्ष यांच्या म्हणण्यानुसार, महागाईचा फटका प्रत्येकासह सलून व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्या सर्वांचा परिणाम २० टक्के दरवाढ करण्यात आलेला आहे. मात्र २० टक्के वाढही पूर्ण नसून महाराष्ट्रातील विविध भागात असलेल्या सलून व्यवसायिकांच्या दरानुसार ही वाढ करण्यात येईल. ज्यावेळेस २० टक्के वाढ करण्यात येणार आहे परंतू सलून व्यावसायिक २० टक्के वाढ करणार नसून आपल्या ग्राहकांच्या विचार करुन ५ ते १० टक्के ही दरवाढ करणार आहे. मात्र आता १ जानेवारीपासून केस कापणं, दाढी करणं महाग होणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी अजून कोणत्या गोष्टी महागणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com