Pankaja Munde on Prajakta Mali Beed : राज्यात घडत असणाऱ्या घटनेवरून राजकीय आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात आता मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विट करत उडी घेतली आहे. पंकजा मुंडे यांनी प्राजक्ता माळी यांचं समर्थन करत सुरेश धस यांना टोला लगावलाय. पंकजा मुंडे यांनी साहित्यिक ट्वीट केलेय. 'दुर्दैवी घटना' हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची, असं मोठं अर्थपूर्ण ट्विट भाजपच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी केलंय. त्याचबरोबर प्राजक्ताची पवित्र फुलं सांडतांना पाहावलं नाही, असंही म्हटलंय.. त्यामुळं पंकजा मुंडेंच्या ट्विटचा रोख कुणाकडे ? अशी चर्चा होऊ लागलीय.
या केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय, की 'शक्ती' शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे.. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची. 'दुर्दैवी घटना'हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे. भावना कुठे आहेत? चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना पण कायद्याने ,नियमाने !! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक..दुर्दैवाने soft targetआहे स्त्री आणि तिचे सत्व. काल पाहवलं नाही ,पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे? तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.