Bachchu Kadu : आमदार निवासात 'प्रहार'

Prahar Sanghatna : मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासाच्या इमारतीवर चढून प्रहार दिव्यांग संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.

मुंबईमध्ये आमदार बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासाच्या इमारतीवर चढून आंदोलन करण्यात आलं आहे. प्रहार दिव्यांग संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहाव्या मजल्यावर ठिय्या मांडला आहे.

यानंतर बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं. कार्यकर्ते मंत्रालयाच्या दिशेने निघाले आहेत. मात्र पोलिसांकडून कार्यकर्त्यांना रोखण्यात आलं आहे. यावेळी एका आंदोलकाला भोवळ देखील आली आहे. दिव्यांग मंत्रालय सुरू केलं आहे. मात्र या ठिकाणी अधिकारीच देण्यात आलेला नाही. त्यामुळे धावपळ होते. अनेक बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारक आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. मात्र या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने बुधवारी प्रहार दिव्यांग संघटनेने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com