VIDEO : पुण्याच्या हिंजवडीत खड्डे आणि वाहतूक कोंडी, आय टी अभियंते अक्षरशः मेटाकुटीला

Pune Hinjwadi Potholes News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची ओळख असलेला हिंजवडी आयटी पार्क अक्षरशः खड्ड्यात गेला आहे. राज्य सरकारला सगळे लाडके दिसतात, मात्र कोट्यावधी रुपयाचा महसूल मिळवून देणारे लाडके आयटीयंस कधी दिसणार? असा संपत्त सवाल करत,अनेक आयटी अभियंते, नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या नेहमीच्या वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील खड्डयांमुळे हिंजवडीतील हे आय टी अभियंते अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हिंजवडीतील कंपन्या परराज्यात स्थलांतरित होत आहेत. तर जे आयटी अभियंते सध्या हिंजवडी आयटी पार्क परिसरात काम करतात, ते वेळेत त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचू शकत नसल्यामुळे, त्यांच्यावर लॉकडाऊन नसताना देखील work from home करण्याची वेळ ओढवली आहे.

वारंवार सांगूनही संबधित यंत्रणा हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीकडे लक्ष देत नसल्याने यापुढील आंदोलन आधिक तीव्र करण्याचा इशारा देखील या अभियंत्यांनी यावेळी दिला आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे पिंपरी चिंचवड शहराचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे यांनी......!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com