Video: PCMC प्रशासनाचा भोंगळ कारभार, लिफ्टमध्ये अडकून पडले पाच जण

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी लिफ्टचे योग्य वेळी मेंटेनन्स करत नसल्याने नागरिकांवर लिफ्टमध्ये फसवून घामाघुम होण्याची वेळ उडवली आहे.

PCMC News: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यालयात जवळपास पाच जण लिफ्टमध्ये अडकून फसले आहेत. महापालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेसाठी आलेले नागरिक युवराज दाखले, चंद्रकांतदादा लोंढे, गणेश दराडे आणि श्रीराम अन्सारी हे नागरिक लिफ्टमध्ये अडकून फसले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे पाच नागरिक मागील वीस मिनिटांपासून लिफ्टमध्ये अडकून फसलेत. पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी लिफ्टचे योग्य वेळी मेंटेनन्स करत नसल्याने नागरिकांवर लिफ्टमध्ये फसवून घामाघुम होण्याची वेळ उडवली आहे. सध्या लिफ्ट मध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचा प्रयत्न महापालिकेतील सुरक्षारक्षक करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com