Pune Video: पूजा खेडकरांच्या आई पत्रकारांवर गेल्या धावून; नेमकं काय घडलं?

Pune News: पुणे पोलिस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी आले होते.तेव्हा पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर ह्यांनी माध्यमांशी हुज्जत घातली आहे.

पूजा खेडकर (pooja Khedkar) यांनी चालवलेल्या गाडीवर बेकायदेशीरपणे दिवा लावणे, या प्रकरणी पुणे पोलिस कारवाई करण्यासाठी आय ए एस पूजा खेडकर यांच्या निवासस्थानी गेले होते,तेव्हा पूजा खेडकर यांच्या आईने माध्यमांशी हुज्जत घातली. पत्रकारांवर त्या धावून गेल्या, माध्यमांना त्या चित्रीकरण करण्यास मनाई करत होत्या,दरम्यान त्याच्या वर्तवणुकीतून पूजा खेडेकरांच्या आईची मुजोरी दिसून आली. त्यांनी आतून गेटला कूलूप लावून घेतलं होतं. यावरुन आता पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com