Satyacha Morcha : 'सत्याचा मोर्चा'च्या आयोजकावर गुन्हा, ठाकरे बंधू अडचणीत येणार? भाजपचा 'मूक मोर्चा'ही अडचणीत

FIR Filed Against 'Satyacha Morcha' Organisers in Mumbai : मुंबईतील 'सत्याचा मोर्चा' आणि भाजपच्या 'मूक मोर्चा' प्रकरणात आयोजकांवर गुन्हा दाखल. परवानगी नसताना मोर्चे काढल्याने पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमुळे ठाकरे बंधू अडचणीत येणार का, असा प्रश्न उपस्थित. राज्यातील राजकीय तापमान वाढले.

Will Thackeray brothers face action over unauthorized Satyacha morcha : मुंबईत महाविकास आघाडी आणि मनसेने निवडणूक आयोगाविरोधात काढलेल्या 'सत्याच्या मोर्चा' नंतर आता आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परवानगी नसताना मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा काढल्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ठाकरे बंधू अडचणीत येणार तर नाहीत ना? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपने काढलेल्या 'मूक मोर्चावर' देखील गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही दोन्ही मोर्चे काढण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या मोर्चांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास झाल्याचं समोर आलं आहे. आता या पोलीस कारवाईमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com