Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस|VIDEO

Modi Meets Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी मोदींनी सुप्रिया सुळेंसोबत बोलताना शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली.

सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा देखील समावेश होता. या भेटीदरम्यान सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुस्तकं भेट म्हणून दिले. सुप्रिया सुळे यांनी कतार, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्तचा दौरा केला होता. दहशतवादाच्या विरोधात भारताची भूमिका जागतिक व्यासपीठावर मांडण्यासाठी हे सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ परदेशात पाठवण्यात आले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रिया सुळे यांना शरद पवार यांच्या तब्येतीबाबत देखील विचारपूस केली. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी धन्यवाद म्हणत मोदींचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com