VIDEO : सावधान! तुमच्या घरातील साखर आणि मीठात प्लॅस्टिक तर नाही ना?

Plastic In Sugar And Salt News : धक्कादायक बातमी! आपल्या स्वयंपाक घरात रोजच्या वापरातील मीठ आणि साखर या पदार्थांमध्ये प्लॅस्टिक असल्याची धक्कादायक बाब एका संशोधनातून समोर आली आहे.

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात आणि जेवणात महत्त्वाचा भाग असलेल्या मीठ आणि साखर या पदार्थांमध्ये, प्लॅस्टिक असल्याची धक्कादायक बाब एका संशोधनातून समोर आली आहे. साखर आणि मीठात लहान-मोठे तुकडे, फिल्म आदी स्वरूपात प्लॅस्टिकचे अंश आढळून आले आहेत.

पर्यावरणीय संस्था टॉक्सिक लिंक ( Toxic Link) ने साखर आणि मिठाच्या दहा विविध प्रकारच्या नमुन्यांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. यामध्ये 0.1 मीमी ते 5.00 मीमी पर्यंतचे तुकडे आढळून आले आहेत. विशेषत: आयोडिनयुक्त मीठामध्ये सर्वाधिक प्लॅस्टिक आढळलं आहे, त्यासोबतच ब्रॅन्डेड मीठ आणि साखरेतही प्लॅस्टिकचा अंश आढळून आला, तसेच नॉन ऑर्गेनिक उत्पादनात सर्वाधिक प्रमाण असल्याचेही दिसून आले. त्यामुळे मीठ आणि साखरेचे सेवन करायचे की नाही अशी भीती आता सर्वसामान्यांच्या मनात घर करू लागलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com