Sharad Pawar Group News : निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला दिलासा, पिपाणी चिन्ह गोठवलं

शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. तुतारीसारखे असलेले पिपाणी चिन्ह आयोगाने गोठवले आहे.

काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यापूर्वी शरद पवार गटाला दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने पिपाणी हे निवडणूक चिन्ह गोठवलं आहे. अजित पवारांनी बंड केल्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवारांचा गट ही खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्वाळा दिला होता. तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले होते. पण काही अपक्ष उमेदवारांना आयोगाने पिपाणी हे चिन्ह दिले होते. काही ठिकाणी पिपाणीला लाखोंची मतं मिळाली होती. म्हणून हे चिन्ह गोठवावं अशी मागणी शरद पवार गटाने केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com