VIDEO: महाराष्ट्राच्या राजकारणात फोटो वॉर, Anil Deshmukh यांच्या 'त्या' आरोपांवर Chitra Wagh यांचं प्रत्युत्तर

Chitra Wagh on Anil Deshmukh News: महाराष्ट्राच्या राजकारणात फोटो वॉर, अनिल देशमुख यांचे फडणवीसांवर गंभीर आरोप.

महाराष्ट्राच्या राजकारणात आता फोटो वॉर रंगलेलं पाहायला मिळत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांचे समित कदम यांच्यासोबत फोटो दाखवत गंभीर आरोप केले होते. यावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चित्रा वाघ यांनी समित कदम यांचा शदर पवार यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे. तीन तासांमध्ये तुमचा पर्दा फाश करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचा इशारा देखील चित्रा वाघ यांनी दिला आहे. आमच्याकडे पुरावे असल्याचं देखील चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे. फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येते अनिलबाबू…यात कसला आला पराक्रम..? असं म्हणत चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख यांना खोचक टोला देखील लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com