Paper Leak News: पेपर लीक वीरोधी कायदा 2024 लागू, सरकारचा मोठा निर्णय

Paper Leak Video: परीक्षांमध्ये होणारा गोंधळ रोखण्यासाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून पेपर लीक कायदा 2024 जारी करण्यात आला आहे.

नीट आणि युजीसी नेट परीक्षांमध्ये गोंधळ झालेला पाहायला मिळाला होता. त्यावर सरकारने आता मोठं पाऊल उचललं आहे. सरकारकडून पेपर लीक कायदा 2024 जारी करण्यात आला आहे. नोकर भरती परीक्षेतील फसवणूक आणि अनियमितता रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या कायद्यानुसार पेपर फुटल्यास किंवा उत्तरपत्रिकेत छेडछाड केल्यास किमान 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पेपर फोडणाऱ्याला १० लाखापर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. परीक्षा आयोजीत करण्यासाठी नियुक्त केलेला व्यक्ती पेपर फोडी मध्ये दोषी आढळल्यास त्याला १ कोटी रुपयांपर्यंतचा दंड लागण्याची तरतूद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com