Pankaja Munde News: पंकजा मुंडेंची राज्यसभेवर वर्णी लागणार?

Pankaja Munde News Today: बीडमध्ये झालेल्या मोठ्या पराभवानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडेंची आता राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. लोकसभेत मुंडेंचा पराभव झाल्यानंतर आता राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाकडून मुंडे यांचं नाव राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठवलं गेल्याची माहितीही समोर आलीये. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लावली जावी, यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही चर्चा केली आहे. मागील काही दिवसांपासून मुंडे यांच्या पराभवाचे दु:ख सहन न झाल्याने काहींनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलही उचलल्याचं दिसून आलंय. त्यामुळे आता भाजप हा महत्त्वाचा निर्णय घेणार का? हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com