Vitthal Mandir News : 700 वर्षांपूर्वीचे विठ्ठल मंदिराचे मूळ रूप दिसणार, 80 टक्के काम पूर्ण

विठ्ठल मंदिराचे 700 वर्षांपूर्वीचे रूप दिसणार आहे. या मंदिराचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

विठ्ठल मंदिराचे नुतनीकरणाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच विठ्ठल मंदिर ७०० वर्षापूर्वीचे मूळ रूप दिसणार आहे. विठ्ठल आणि रुक्मीणीच्या गाभाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. १७ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढीची शासकीय महापूजा होणार आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. यासाठी राज्य शासनाने 74 कोटी रूपयांचा निधी दिला आहे. मागील अडीच महिन्यांपासून हे काम सुरू होते. आतापर्यंत मंदिरातील जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com