Maharashtra Politics : सरकार सर्वसामान्य विद्यार्थ्यांची फसवणूक करतंय; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, पाहा VIDEO

Ambadas Danve Criticized BJP On ZP School Student Uniform : राज्यात सध्या शालेय विद्यार्थ्यांना निकृष्ट गणवेशाचं वाटप केल्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय. त्यामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय.

मुंबई : राज्यात शालेय गणवेशांच्या वाटपावरून वातावरण तापलेलं आहे. याच मुद्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरल्याचं समोर आलंय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादान दानवे ४५ लाख विद्यार्थ्यांना गणवेश १५ ऑगस्टपर्यंतच द्यायला हवे होते, परंतु अद्याप ७ ते ८ लाख विद्यार्थ्यांपर्यंत देखील गणवेश पोहोचलेले नाही. अगोदर शालेय समिती गावात जावून गणवेश घेत होती, ते गणवेश व्यवस्थित यायचे असे दानवे म्हणाले आहेत. सरकार सर्वसामान्य विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

राज्यातील ७ ते ८ लाख विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही. जे मिळाले ते फाटके, मोठे छोटे दिलेत, ही फसवणूक झालेली आहे. सकाळ आणि साम मीडियाने यावर आवाज उठवला. आता विद्यार्थी सुद्धा शासनाला धडा शिकवतील, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलीय. "राज्यातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत", असा अंबादास दानवेंचा भाजपवर हल्लाबोल केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com