Video: धावत्या शिवशाहीच्या चाकाचे नट निघाले, अनर्थ टळला!

बसचे चाक व्यवस्थित न बसल्याने चाकाचे सहा नटबोल्ट पडलेत. यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या कार चालकाच्या लक्षात येताच ...

Shivshahi News: धावत्या बसच्या चाकाचे नटबोल्ट निघालेत आणि मोठा अनर्थ टळलाय. नाशिकहून पुण्याच्या दिशेने जात असताना आळेफाटा जवळ धावत्या शिवशाहीच्या चाकाचे चक्क नटबोल्टच निघालेत. बसचे चाक व्यवस्थित न बसल्याने चाकाचे सहा नटबोल्ट पडलेत. यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या कार चालकाच्या लक्षात येताच मंचर जवळील कळंब इथे शिवशाही बस थांबवण्यात आली आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मोठा अनर्थ टळला मात्र भरभक्कम तिकिट घेऊनही शिवशाही बस नादुरुस्त, पावसात बसमध्ये गळती सुरु असल्याने शिवशाहीची दुरवस्था झालीय त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशीच खेळ सुरुय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com