Early Cancer Detection Formula: आता ब्लड टेस्टमधून कळणार कॅन्सरचा धोका? 3 वर्ष आधीच होणार कॅन्सरचं निदान?

Blood test for cancer diagnosis : कर्करोगाचे निदान लवकर होणे हे उपचारांच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांपासून 'लिक्विड बायोप्सी' (Liquid Biopsy) आणि 'मल्टी-कॅन्सर अर्ली डिटेक्शन (MCED) टेस्ट' यांसारख्या तंत्रज्ञानावर वेगाने संशोधन सुरू आहे
Blood test for cancer diagnosis
Blood test for cancer diagnosissaam tv
Published On

कॅन्सरची लागण होण्याच्या 3 वर्षे आधीच कॅन्सरचं निदान झालं तर.... तुम्हाला हे अशक्य वाटतंय ना... मात्र हे खरंय... त्याविषयी संशोधनातून माहिती समोर आली आहे. जर तुम्हाला तीन वर्षे आधीच समजलं की तुम्हाला कॅन्सर होणार आहे तर तुम्ही तो वेळेत थांबवू शकता येणार आहे. नेमकं हे संशोधन काय आहे हे पाहूयात.

कॅन्सर नाव काढलं तरी अनेकांना धडकी भरते. मात्र कॅन्सरची लक्षणं दिसण्याच्या 3 वर्षे आधीच तुम्हाला कॅन्सरची माहिती मिळाली तर... होय हे शक्य होणार आहे. कारण शास्त्रज्ञांनी मल्टी कॅन्सर अर्ली डिटेक्शनचा शोध लावला आहे. मात्र ही चाचणी काय आहे? ते पाहूयात.

Blood test for cancer diagnosis
Heart Pacemaker: तांदळाच्या आकाराचा पेसमेकर; हृदयात कसं बसवणार, काम कसं करणार जाणून घ्या संपूर्ण माहिती

नेमकं काय आहे हे संशोधन पाहा व्हिडीओच्या माध्यमातून-

Blood test for cancer diagnosis
Stomach Cancer Early Symptoms: पोटाचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात दिसतात ५ महत्त्वाचे बदल; दुर्लक्ष करणं पडेल महागात
  • अमेरिकेतील जॉन्स हॉफकिन्स विद्यापीठाचं संशोधन

  • कॅन्सरचं 36 महिने आधीच निदान होण्याचा दावा

  • कॅन्सर डिस्कव्हरी या प्रतिष्ठित जर्नलमध्ये संशोधन प्रसिद्ध

  • मल्टी कॅन्सर अर्ली डिटेक्शन ही प्रायोगिक टेस्ट

  • डीएन, आरएनए आणि प्रोटीनच्या टेस्टमधून कॅन्सर होण्याचा अंदाज येणार

  • 36 महिने आधीच जनेटिक म्युटेशनमुळे कॅन्सरचं निदान होणार

  • कॅन्सर होण्यापुर्वीच निदान झाल्यास धोका टळण्याची शक्यता

Blood test for cancer diagnosis
Early Cancer Detection Formula: आता ३ वर्षाआधीच कळणार कॅन्सर होणार की नाही! रिसर्चर्सने शोधला नवा फॉर्म्युला

दरवर्षी भारतात 14 लाख लोकांना कॅन्सरची लागण होते. मात्र यंदा त्यात मोठी वाढ झालीय. त्यामुळे हे संशोधन यशस्वी झाल्यास ही वैद्यकीय क्षेत्रातील मोठी क्रांती असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com