Saam Impact: कल्याणमध्ये खोट्या ओळखपत्रांप्रकरणी 5 बीएलओंना नोटीस!

Kalyan News: कल्याण शीळ रस्त्यावर गोणीभरुन ओळखपत्र सापडल्यानो एकच खळबळ उडाली आहे. ओळखपत्रांप्रकरणी ५ बीएलओंना नोटीस बजावण्यात आली आहे. साम टीव्हीने उचलून धरलेल्या बातमीचा IMPACT पाहायला मिळत आहे.

कल्याण: लोकसभेवेळी बोगस मतदान झाल्याचा आरोप अनेक उमेदवारांनी केला होता. यादरम्यान कल्याण शीळ रस्त्यावर गोणी भरुन ओळखपत्र सापडली होती. ओळखपत्र रस्त्यावर सापडल्याने खळबळ माजली होती. ही बातमी साम टीव्ही ने उचलून धरली होती. त्यामुळे मतदार नोंदणी अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. खोट्या ओळखपत्रांप्रकरणी त्यांनी कारवाई करत ५ बीएलओंना नोटीस बजावली आहे. सापडलेली सर्व ओळखपत्र जुनी आहेत. असं मतदार नोंदणी अधिकारी गुजर यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com